सामाजिक संघटनेची
प्राथमिक नियमावली व कार्यआराखडा
प्रा. डॉ. इशांत गजानन राजगुरे
श्री संताजी जगनाडे महाराजांचा समाजहिताचा वैचारिक दृष्टिकोन मनामनात बिंबवणे.
जयंती उत्सवातून सामाजिक जागृती करणे.
समाजातील सर्व घटकांना एकत्रित करून सामाजिक ऐक्य दृढ करणे.
शिक्षण, रोजगार, उद्योजकता व आरोग्य क्षेत्रातील योजना राबवणे.
गुणवंत विद्यार्थी, समाजसेवक व उद्योजकांचा गौरव करणे.
महिला, युवक व ज्येष्ठ नागरिकांसाठी विकासात्मक उपक्रम राबवणे.
समाजहिताच्या प्रश्नांवर विधायक भूमिका घेऊन शासनाशी समन्वय साधणे.
वधू-वर मेळाव्यासारख्या कार्यक्रमांची रूपरेषा आखणे.
जिल्हा व तालुका स्तरावर समित्या स्थापन करून समन्वय राखणे.
वार्षिक कार्य योजना तयार करून प्रभावी अंमलबजावणी करणे.
प्रत्येक तिमाहीत आढावा बैठक आयोजित करणे.
सदस्य नोंदणी व सदस्यसंख्या वाढीसाठी विशेष मोहीम राबवणे.
आर्थिक शिस्त, पारदर्शकता व लेखापरीक्षण सुनिश्चित करणे.
सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक उपक्रमांना मार्गदर्शन करणे.
शासन, स्वयंसेवी संस्था, आरोग्य व उद्योग क्षेत्राशी सहकार्य निर्माण करणे.
वार्षिक अहवाल व आर्थिक अहवाल राज्य कार्यकारिणीकडे सादर करणे.
समाजभूषण, गुणवंत विद्यार्थी, पालक व शिक्षक सन्मान सोहळे.
शैक्षणिक, करिअर व स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यशाळा.
आरोग्य तपासणी व रक्तदान शिबिरे.
महिला सक्षमीकरण व स्वयंरोजगार प्रशिक्षण.
युवक नेतृत्व व कौशल्य विकास कार्यक्रम.
वृक्षारोपण, पर्यावरण संवर्धन व स्वच्छता अभियान.
गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व शिष्यवृत्ती सहाय्य.
गरजू कुटुंबांसाठी आपत्कालीन समाजसेवा मदत.
जानेवारी – सदस्य नोंदणी व नियोजन बैठक.
फेब्रुवारी – आरोग्य तपासणी शिबिर.
एप्रिल – करिअर व रोजगार मार्गदर्शन.
जून – वृक्षारोपण अभियान.
जुलै – गुणवंत विद्यार्थी सत्कार.
ऑगस्ट – समाजभूषण पुरस्कार वितरण.
सप्टेंबर – महिला सक्षमीकरण कार्यक्रम.
ऑक्टोबर – उद्योजकता विकास कार्यशाळा.
नोव्हेंबर – दिवाळी मिलन कार्यक्रम.
डिसेंबर – संताजी महाराजांची जयंती, स्नेहसंमेलन व वार्षिक आढावा.
प्राथमिक सदस्य नोंदणी शुल्क – ₹ १०१/- प्रतिवर्ष.
वार्षिक कार्यकारिणी सभासद शुल्क – ₹ १००१/-.
देणग्या व समाजहित निधी.
प्रायोजक संस्था व उद्योग क्षेत्राकडून विशेष आर्थिक सहाय्य.
सामाजिक कार्यक्रमांमधून प्राप्त निधी.
शैक्षणिक व सामाजिक उपक्रम, पुरस्कार व सन्मान.
TA & DA, प्रचार-प्रसिद्धी व आपत्कालीन समाजसेवा निधी.
लेखापरीक्षण व कार्यालयीन व्यवस्थापन.
सर्व आर्थिक व्यवहार बँक खात्यामार्फत करणे.
प्रत्येक खर्चास स्थायी समितीची अधिकृत मंजुरी आवश्यक.
वार्षिक लेखापरीक्षण करून अहवाल सर्वसाधारण सभेत सादर करणे.
आर्थिक माहिती सदस्यांसाठी उपलब्ध ठेवणे.
दर तीन महिन्यांनी विभागीय बैठक घेणे.
सर्व पदाधिकाऱ्यांना वार्षिक सर्वसाधारण सभा अनिवार्य.
आपत्कालीन गैरहजेरीची पूर्वकल्पना द्यावी.
आवश्यकतेनुसार विशेष बैठक बोलावता येईल.
बैठकीचे इतिवृत्त लेखी स्वरूपात नोंदवणे.
सामाजिक ऐक्य, शिस्त व पारदर्शकतेचे पालन करणे.
जात, धर्म, पक्षीय राजकारण व वैयक्तिक मतभेद संघटनेच्या कामकाजात आणू नयेत.
समाजहित सर्वोच्च मानून एकसंघतेने कार्य करणे.
संघटनेच्या प्रतिष्ठेला बाधा पोहोचेल असे कृत्य टाळणे.
प्रचार-प्रसार नियोजित पद्धतीने मार्गदर्शक समितीच्या निर्देशानुसार करणे.
विभागीय अध्यक्षांनी उपक्रमाची संपूर्ण माहिती संपर्क प्रमुख व प्रवक्त्यांना देणे.
वर्षभरातील कार्यक्रमांचा तपशील.
लाभार्थ्यांची संख्या.
आर्थिक उत्पन्न व खर्चाचा सारांश.
सदस्यसंख्या वाढीचा अहवाल.
विशेष यश व पुरस्कार.
पुढील वर्षाची उद्दिष्टे व कृती आराखडा.
“संघटन – शिक्षण – सेवा – स्वावलंबन – समाजोन्नती”
मसुदा दिनांक – १६/०६/२०२६
प्राथमिक बैठक – ०६/०६/२०२६
द्वितीय बैठक – ०८/०८/२०२६
तृतीय बैठक – ११/०८/२०२६
लेखन व सादरीकरण – प्रा. डॉ. इशांत गजानन राजगुरे
सर्व मुद्द्यांवर चर्चा करून अंतिम नियमावली व कार्यप्रणाली सादर करण्यात आली.
राज्य कार्यकारिणीच्या मार्गदर्शनाखाली अमरावती विभागीय मंडळाची स्वतंत्र घटना म्हणून नियमावली व कार्यआराखडा प्रमाणित करण्यात यावा.
राज्यस्तरीय प्रतिनिधी – मा.खा. श्री रामदासजी तडस साहेब
सर्व उपस्थित स्थायी समिती सदस्यांचे मार्गदर्शन व सहकार्य अपेक्षित.